Vijay Wadettiwar : कुख्यात गुंड गजा मारणेकडून चंद्रकांत पाटलांचा सत्कार; विजय वडेट्टीवार ट्विट करत म्हणाले...

Vijay Wadettiwar : कुख्यात गुंड गजा मारणेकडून चंद्रकांत पाटलांचा सत्कार; विजय वडेट्टीवार ट्विट करत म्हणाले...

कुख्यात गुंड गजा मारणेकडून चंद्रकांत पाटलांचा सत्कार करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

कुख्यात गुंड गजा मारणेकडून चंद्रकांत पाटलांचा सत्कार करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. कुख्यात गुंड गजानन मारणे याने मंगळवारी झालेल्या दही हंडी कार्यक्रमात मंत्री चंद्रकांत पाटील यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. गजा मारणे आणि चंद्रकांत पाटलांचा हा व्हिडिओ व्हायरल होत असून या व्हिडिओमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता विजय वडेट्टीवार यांनी ट्विट केलं आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, ‘लाडके गुंड‘ कुख्यात आणि महायुती सरकारचा लाडका गुंड गजानन मारणे याने मंगळवारी झालेल्या दहीहंडी कार्यक्रमात मंत्री चंद्रकांत पाटील यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मंत्री महोदयांनी देखील पुष्पगुच्छ स्वीकारून गजानन मारणेला हात जोडले.

पुण्यातील कोथरूड भागात असलेला गजानन मारणे, त्याच कोथरुड मधील आमदार चंद्रकांत पाटील. लोकप्रतिनिधी हे जनतेसाठी असतात पण परत निवडून येण्यासाठी आजच्या परिस्थितीत महायुतीला लाडके गुंड महत्वाचे आहे म्हणून सत्कार चमत्कार गुंडाकडून घेतले जात आहे.या भागातील नागरिकांना अश्या गुंडपासून संरक्षण देणे ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी असताना मंत्री महोदय गुंडाला ‘राजाश्रय‘ देत आहे.

यासोबतच ते म्हणाले की, भाजपचे माजी मंत्री आणि विद्यमान खासदार यांनी आणि त्यांच्या मुलाने पोलिसांची इज्जत कशी काढली हे काल दिवसभर संपूर्ण महाराष्ट्राने live पाहिले. पोलिसांना धमकावण्याचा असा माज खासदार नारायण राणे आणि त्यांचा मुलगा निलेश राणे यांना कुठून आला हा प्रश्न जनतेला पडला होता. त्याचे उत्तर मंत्री चंद्रकांत पाटलांनी दिले आहे. या राज्यात पोलिसांची इज्जत राहिली नाही. मंत्री गुंडांकडून सत्कार करून घेतात, आमदार पोलिसांना शिवीगाळ करतात, धमकावतात. जिथे गुंडांना राजाश्रय मिळत आहे तिथे सामान्य जनतेने आपले रक्षण होईल या भाबड्या आशा ठेवू नये. गुंडांना डोक्यावर घेऊन मिरवणाऱ्या या सरकारला आता जनतेने पुष्पगुच्छ देऊन निरोप द्यावा हीच राज्यातील जनतेला विनंती. असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com