Santosh Bangar
Santosh BangarTeam Lokshahi

ठाकरेंनंतर शिवसेना पक्षप्रमुख कोण? बांगर यांनी सांगितले नाव

शिवसेनेच्या पक्षप्रमुखाची निवड केली जाणार आहे. या निवडीमध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून आम्हाला एकनाथ शिंदे यांना पाहायला आवडेल.
Published by :
Sagar Pradhan
Published on

काही महिन्यांपूर्वी शिवसेनेत अभूतपूर्व बंडखोरी झाली. त्यानंतर शिवसेनेत दोन गट पडले. या बंडखोरीमुळे दोन्ही गटाकडून शिवसेना आपलीच असा दावा करण्यात आला. शिवसेना पक्ष तसेच धनुष्यबाण हे पक्षाचे निवडणूक चिन्ह नेमके कोणाचे या मुद्द्यावरून शिंदे आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात सध्या कायदेशीर लढाई सुरू आहे. मात्र, २३ जानेवारी रोजी शिवसेनाच्या पक्षाध्यक्षाची मुदत संपत आहे. यामुळे पक्षाध्यक्ष होणार राहणार याची उत्सुकता वाढली आहे. त्यावरच आता शिंदे गटातील आमदार संतोष बांगर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Santosh Bangar
निर्णायक सामन्यात भारताचा न्यूझीलंडवर सोपा विजय, मालिकाही घेतली आपल्या ताब्यात

शुक्रवारीच निवडणूक आयोगासमोर याबाबत सुनावणी पार पडली. आयोगासमोर आता पुढील सुनावणी ३० जानेवारी तारीखेला होणार आहे. मात्र, त्याआधी २३ जानेवारी रोजी शिवसेनाच्या पक्षाध्यक्षाची मुदत संपत आहे. त्यामुळे या पदावर आता एकनाथ शिंदे बसणार की उद्धव ठाकरे कायम राहणार हा प्रश्न अनुत्तरीत आहे. यावरच आता शिंदे गटातील नेते संतोष बांगर यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, शिवसेनेच्या पक्षप्रमुखाची निवड केली जाणार आहे. या निवडीमध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून आम्हाला एकनाथ शिंदे यांना पाहायला आवडेल,” असे संतोष बांगर म्हणाले आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com