कोण होणार दिल्लीचे मुख्यमंत्री? आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता

कोण होणार दिल्लीचे मुख्यमंत्री? आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता

दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळाले.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळाले. दिल्लीच्या विधानसभेत आम आदमी पक्षाला फक्त 22 जागा मिळाल्यात, तर भाजपाला 48 जागा मिळाल्या आणि काँग्रेसला एकही मिळाली नाही.

आता दिल्लीचे नवे मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा सुरु झाली आहे. दिल्लीचं मुख्यमंत्री कोण असणार? याची अद्याप माहिती मिळाली नाही आहे.

शपथविधीबाबत आज दुपारी 3 वाजता भाजपची बैठक होणार असून या बैठकीत मुख्यमंत्री ठरल्यास नवीन सरकारचा शपथविधी सोहळा 18 किंवा 19 फेब्रुवारीला होणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com