Sanjay Raut
Sanjay RautNew Parliament

Sanjay Raut: संसदेत खासदार शिवीगाळ करतात त्यांच्यावर कारवाई का नाही?

नव्या संसद भवनावर विरोधकांनी टीका सुरु केलीय. नवीन संसदभवन म्हणजे मोदीचं मल्टिप्लेक्स असल्याचं मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलंय.
Published on

नव्या संसद भवनावर विरोधकांनी टीका सुरु केलीय. नवीन संसदभवन म्हणजे मोदीचं मल्टिप्लेक्स असल्याचं मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलंय. नव्या संसदभवनात खासदारांसाठी कोणत्याही सुविधा नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. नवं संसदभवन भव्य असलं तरी जुन्या संसदभवनासारखी अनुभूती तिथं येत नसल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे. विरोधी पक्षांच्या खासदारांचं मन अजूनही जुन्या संसद भवनात रमत असल्याचं राऊत यांनी म्हटलंय. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनीही नव्या संसद भवनांतील असुविधांबाबत नाराजी व्यक्त केली होती.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com