sharmila Thackeray
sharmila Thackeray Team Lokshahi

या सरकारच्या मंत्रीमंडळात महिलांना नक्की स्थान मिळणार - शर्मिला ठाकरे

शिवसेनेवर बोलण्यास शर्मिला ठाकरेंचा स्पष्ट नकार
Published by :
Sagar Pradhan
Published on

राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते आज पुण्यात एका साडीच्या दुकानाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी खरेदीही केली. या उद्घाटना दरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राजकीय टीकाटिप्पणी करणार नाही असे त्यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले.मी दुसऱ्या पक्षावर टीका करणार नाही. मात्र ते त्यांच्या फायद्यासाठी करत आहे, त्यांचा अजेंडा राबवत आहेत, अशी प्रतिक्रिया मनसे नेत्या शर्मिला ठाकरे यांनी दिली.

sharmila Thackeray
रिफायनरी प्रकल्पावरून रत्नागिरीत निलेश राणेंचा ताफा अडवला

मी मुलावर, पतीवर लक्ष ठेवून असते

शर्मिला ठाकरे म्हणाल्या की, मी इतर पक्षांवर टीका करणार नाही. सरकार काय करत आहे हे नाही, तर माझा मुलगा काय करत आहे, माझा नवरा काय करत आहे किंवा माझा पक्ष काय करत आहे, याच्यावर मी लक्ष ठेवून असते, शिवसेनेवर बोलण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला.

महिला आणि बालविकास हे खाते महिलेकडे असेल तर चांगले

शिंदे सरकारच्या मंत्रीमंडळात महिलांना नक्की स्थान मिळणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. भाजपाकडे चांगल्या महिला आहेत. पंकजा मुंडे आहेत, त्यांच्याकडे मंत्रीपद गेले तर चांगले आहे. त्यांनी मागच्यावेळी चांगले काम केले होते, असे शर्मिला ठाकरे म्हणाल्या. तर महिला आणि बालविकास हे खाते महिलेकडे असेल तर अधिक चांगले होईल, अशी अपेक्षा त्यांनी बोलतांना व्यक्त केली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com