मावळमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा

मावळमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा

Published by :
Published on

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. ओबीसी आरक्षणासाठी राज्यभरात 1 हजार ठिकाणी भाजपकडून 26 जून अर्थात आज शनिवारी जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे याच पार्श्वभूमीवर मावळ भाजपच चक्काजाम आंदोलन सुरू झाले आहे. मावळ मधील पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गा उर्से येथे बंद करण्यात आला आहे. माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू झाले आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com