Versova-Virar Sea Link: मुंबईत बनणार सर्वात लांब सागरी सेतू; अडीच तासांचे अंतर अवघ्या 30 मिनिटांत होणार पूर्ण

Versova-Virar Sea Link: मुंबईत बनणार सर्वात लांब सागरी सेतू; अडीच तासांचे अंतर अवघ्या 30 मिनिटांत होणार पूर्ण

मुंबईतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी नवनवीन प्रॉजेक्ट सुरु करण्यात येत आहेत.
Published by :
Dhanshree Shintre

मुंबईतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी नवनवीन प्रॉजेक्ट सुरु करण्यात येत आहेत. अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू नमतर आता वर्सोवा ते विरार असा ४३ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. या दृश्याची नुसती कल्पना केल्यास तुमचे मन उत्साहाने भरून जाईल. हा उड्डाणपूल बांधल्यानंतर अडीच तासांचे प्रवासाचे अंतर 30 मिनिटांवर येणार आहे.

उड्डाणपूल देशातील सर्वात लांब सागरी सेतू तर ठरणार आहेच, पण त्याची रुंदीही 8 लेनची असणार आहे. दोन टप्प्यात बांधण्यात येणाऱ्या या उड्डाणपुलासाठी सुमारे ६४ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूला ४-४ पदरी रस्ता तयार करण्यात येणार आहे. वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची सुटका व्हावी यासाठी वर्सोवा ते विरार या दरम्यान हा सागरी पूल बांधण्यात येणार आहे.

दरम्यान, मुंबईतल्या व्यक्तीला विरारला पोहोचायला दोन ते अडीच तास लागतात. मात्र वर्सोवा-विरार सी-लिंक पॉईंटमुळे हे अंतर कमी होणार आहे. मुंबईतील व्यक्ती केवळ ३० मिनिटांत विरारला पोहोचणार आहे. हा विकास केवळ शहरापुरता मर्यादित न ठेवता पालघरसह ग्रामीण भागापर्यंत विकास पोहोचविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com