Mhada Home Lottery : घराचे स्वप्न साकार होणार! म्हाडाच्या कोकण मंडळाकडून 5 हजार 354 घरांची आज सोडत
थोडक्यात
घराचे स्वप्न साकार होणार
म्हाडाच्या कोकण मंडळाकडून 5 हजार 354 घरांची आज सोडत
डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात ही लॉटरी काढण्यात येईल
( Mhada Home Lottery) 'म्हाडा'च्या कोकण मंडळातर्फे ठाणे शहर व वसई येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या 5 हजार 354 सदनिका व ओरोस, कुळगाव-बदलापूर येथील 77 भूखंड विक्रीकरिता जाहिरात काढण्यात आली होती.म्हाडाच्या कोकण मंडळाकडून 5 हजार 354 घरांसाठी आणि 77 भूखंडांच्या विक्रीकरता लॉटरीची घोषणा करण्यात आली होती.
ठाणे येथील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ही लॉटरी काढण्यात येईल. आज सकाळी 11 वाजता सोडतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या घरांसाठी एकूण १ लाख ८४ हजार ९९४ अर्थ प्राप्त झालेत. यापैकी १ लाख ५8 हजार ४२४ अर्थ अनामत रकमेसह आहेत. या सोडतीच्यावेळी सभागृहाच्या आवारात व सभागृहात एलइडी स्क्रीन लावण्यात येणार आहे.