महाराष्ट्र
Sangli : मिरजेत अजित पवारांच्या सभेवेळी जोरदार घोषणाबाजी
आज सांगलीत उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रचार सभा आहे.
(Sangli) आज सांगलीत उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रचार सभा आहे.उमेदवाराच्या प्रचारासाठी मिरजेत जाहीर सभा होणार असून या सभेच्यावेळी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हद्दपार केलेला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार आझम काझी याच्या समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर घोषणाबाजी करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.
आझम काझी याचा समर्थक मतीन काझी व अन्य 4 हद्दपार गुन्हेगारांनी समर्थकांसह घोषणाबाजी आणि पोस्टरबाजी करत गोंधळ घातला. सांगली पोलिसांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार आझम काझी याला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हद्दपार केलं आहे.
Summary
मिरजेत अजित पवारांच्या सभेवेळी जोरदार घोषणाबाजी
आझम काझींच्या समर्थकांकडून घोषणाबाजी
घोषणाबाजी करून लक्ष वेधण्याचा प्रयत्न
