LPG cylinder price hike
LPG cylinder price hike team lokshahi

LPG cylinder price hike : गॅस सिलेंडरच्या किमतीत पुन्हा वाढ, आता 'ही' आहे किंमत

Published by :
Shweta Chavan-Zagade

महागाईने सर्व सामान्य माणसाचे हाल होत असताना गुरुवारी सकाळी आणखी एक झटका बसला. या महिन्यात दुसऱ्यांचा एलपीजी सिलेंडरच्या किमतीत (LPG cylinder price hike) वाढ झाली आहे. आता देशभरात घरगुती एलपीजी ( LPG cylinder price news ) सिलिंडरच्या किमती 1 हजार रुपयांच्या ( Domestic LPG gas cylinder price ) पुढे गेल्या आहेत. आज घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत 3.50 पैशांनी वाढ झाली आहे. त्याचबरोबर, व्यावसायिक गॅस सिलिंडर 8 रुपयांनी महागला आहे.

LPG cylinder price hike
Ed action on Raj Kundra : राज कुंद्रावर ईडीची कारवाई, मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल

घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात 3 रुपये 50 पैशांनी वाढ

आजपासून (१९ मे) दिल्ली आणि मुंबईमध्ये 14.2 किलोचा घरगुती एलपीजी सिलिंडर 1 हजार 3 रुपयांना मिळणार आहे. गेल्या एका वर्षांत दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडर 809 रुपयांवरून 1 हजार 3 रुपयांवर गेला आहे. आज एलपीजीची किंमत कोलकातामध्ये 1 हजार 29 रुपये आणि चेन्नईमध्ये 1 हजार 18.5 रुपये झाली आहे. यामुळे लोकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.

यापूर्वी 7 मे रोजी दरात वाढ करण्यात आली होती

याआधी 7 मे 2022 रोजी देशात घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आली होती आणि त्यावेळी प्रति सिलेंडर 50 रुपयांची प्रचंड वाढ झाली होती. मे महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात दोनदा वाढ करण्यात आली आहे. त्याचवेळी, आज व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमतही 8 रुपयांनी महागली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com