Ashadhi Wari 2022 : मुख्यमंत्र्यांच्या चार पिढ्यांनी केली विठू माऊलीची महापूजा
admin

Ashadhi Wari 2022 : मुख्यमंत्र्यांच्या चार पिढ्यांनी केली विठू माऊलीची महापूजा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांचे वडील, त्यांचा मुलगा आणि त्यांचा नातूचा समावेश आहे. ज्यांच्या चार पिढ्यांकडून एकत्र पूजा व वारी झाली असे एकनाथ शिंदे हे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत.
Published by :
Team Lokshahi

Ashadhi Wari 2022 : आषाढी एकादशीचा सोहळ्यास आज पंढरपुरात उत्साहात सुरुवात झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भक्तीभावाने पूजा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चार पिढ्या पूजेच्या वेळी उपस्थित होत्या. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांचे वडील, त्यांचा मुलगा आणि त्यांचा नातूचा समावेश आहे. ज्यांच्या चार पिढ्यांकडून एकत्र पूजा व वारी झाली असे एकनाथ शिंदे हे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत.

Ashadhi Wari 2022 : मुख्यमंत्र्यांच्या चार पिढ्यांनी केली विठू माऊलीची महापूजा
Ashadhi Ekadashi : बीडच्या नवले दाम्पत्याला मानाच्या वारकऱ्याचा मान

विठुरायाच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या संपूर्ण कुटुंबासह उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांचे वडील संभाजी शिंदे, मुलगा श्रीकांत आणि नातू देखील पूजेसाठी उपस्थित होते. विठू माऊलीच्या महापूजेसाठी एकनाथ शिंदे कुटुंबासह शनिवारी रात्री उशिरा पंढरपुरात दाखल झाले. त्यांच्या स्वागतासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

Ashadhi Wari 2022 : मुख्यमंत्र्यांच्या चार पिढ्यांनी केली विठू माऊलीची महापूजा
Ashadhi Ekadashi : बीडच्या नवले दाम्पत्याला मानाच्या वारकऱ्याचा मान

विठुरायाच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या संपूर्ण कुटुंबासह उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांचे वडील संभाजी शिंदे, मुलगा श्रीकांत आणि नातू देखील पूजेसाठी उपस्थित होते. विठू माऊलीच्या महापूजेसाठी एकनाथ शिंदे कुटुंबासह शनिवारी रात्री उशिरा पंढरपुरात दाखल झाले. त्यांच्या स्वागतासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

राज्यातील १२ कोटी जनतेच्यावतीने महापूजा

राज्यात आषाढी एकादशीची वारी एक महापर्व असून या वारीला एक मोठी परंपरा लाभलेली आहे. आषाढी एकादशीला महापूजा करण्याचा सन्मान मिळाल्याने हा दिवस जीवनातील सर्वात महत्त्वाचा दिवस असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. राज्यातील १२ कोटी जनतेच्यावतीने आपण ही शासकीय महापूजा केली असल्याचे सांगून त्यांनी राज्यातील जनतेला आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या.

वारकरी सन्मान व एसटी मोफत पास वितरण

आजच्या शासकीय महापूजेचे मानाचे वारकरी दाम्पत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच मानाच्या वारकऱ्यांना राज्य परिवहन महामंडळाकडून वर्षभरासाठी देण्यात येणाऱ्या मोफत पासचे वितरणही श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी एसटी महामंडळाचे वाहतूक महाव्यवस्थापक सुजय जाधव, उपमहाव्यवस्थापक अजित गायकवाड व विभाग नियंत्रक विलास राठोड उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे व मान्यवरांच्या हस्ते 'रिंगण' या वारी विशेषांकाचे प्रकाशन देखील याप्रसंगी करण्यात आले.

निर्मल दिंडी पुरस्कार वितरण

पंढरीची वारी ही महाराष्ट्राची प्राचीन आध्यात्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. वारीत सहभागी होणाऱ्या अनेक दिंड्या सामाजिक प्रबोधनाचे कार्य करत असतात. या दिंड्यांचा आदर्श घेऊन 'निर्मल वारी हरित वारी ' अभियानामध्ये नागरिकांचा सहभाग वाढवावा या उद्देशाने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती यांच्यामार्फत 'श्री विठ्ठल निर्मल दिंडी' पुरस्कार देण्यात येतो. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. प्रथम क्रमांकाचे पारितोषिक श्री संत तुकाराम महाराज कोकण दिंडी पनवेल जिल्हा रायगड (एक लाख रुपये व सन्मानचिन्ह), द्वितीय क्रमांक-वै.ह भ. प. भाऊसाहेब महाराज खरवळकर दिंडी, मु.पो.शेरा, तालुका रेणापूर, जिल्हा लातूर (७५ हजार व सन्मान चिन्ह) तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक श्री संत जगनाडे महाराज दिंडी घोटी बुद्रुक जिल्हा नाशिक (५० हजार व सन्मान चिन्ह) दिंडीला प्रदान करण्यात आले. तसेच 'ग्रीन बिल्डिंग' पुरस्काराचे वितरणही या वेळी करण्यात आले.

प्रारंभी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.लता शिंदे यांचा विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. श्री औसेकर महाराज यांनी प्रास्ताविक केले, तर आभार समिती सदस्य प्रकाश जंजाळकर महाराज यांनी मानले.

यावेळी खासदार सर्वश्री डॉ.श्रीकांत शिंदे, संजय(बंडू) जाधव, आमदार सर्वश्री दीपक केसरकर, तानाजी सावंत, दादाजी भुसे, संजय राठोड, शहाजीबापू पाटील, समाधान आवताडे, सचिन कल्याणशेट्टी, भरतशेठ गोगावले, रवींद्र फाटक, राणा जगजितसिंह पाटील, माजी आमदार विजय शिवतारे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकरी गजानन गुरव यांच्यासह समितीचे अन्य सदस्य उपस्थित होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com