Maharashtra Assembly Monsoon Session
Maharashtra Assembly Monsoon Session

Maharashtra Assembly Monsoon Session : आज विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यात येणार

राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन 30 जूनला सुरु झाले असून उद्यापर्यंत असणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

(Maharashtra Assembly Monsoon Session) राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन 30 जूनला सुरु झाले असून उद्यापर्यंत असणार आहे. आज पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा असून शेवटच्या आठवड्यातही विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत.

पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू असून विविध मुद्द्यांवर विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. विधान परिषदेत आज राज्यातील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या शाळांबाबत चर्चा केली जाणार आहे.तसेच त्याबाबत उपाययोजना करावी अशी मागणी करण्यात येणार

तसेच काही औषधं राज्यात विकली जातात ज्याच्या पाकीटांवर दिलेल्या माहितीपेक्षा आणि दिलेल्या घटकापेक्षा कमी घटक असतात, परराज्यातून येणारे औषधे नियमाचे उल्लंघन करून परवानगी दिली जाते. त्यातील काही औषधं, गोळ्यांपासून एमडी ड्रग्ज तयार केली जातात याबाबत शासनाचे लक्ष वेधून एसआयटी चौकशीची मागणी करण्यात येणार आहे

कृषी पंपाचे बिल माफ केले असले तरी सरसकट बिल भरण्यासाठी शेतकऱ्यांकडे तगादा लावला जातोय याबाबत सरकारचे लक्ष वेधण्यात येणार असून आज विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे.या अंतिम आठवडा प्रस्तावातून विरोधक राज्यातील सर्व मुद्यावरून सरकारवर निशाणा साधणार असल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com