Maharashtra Assembly Monsoon Session
Maharashtra Assembly Monsoon Session

Maharashtra Assembly Monsoon Session: राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून; विविध मुद्द्यांवरुन विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत

आजपासून राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

(Maharashtra Assembly Monsoon Session) आजपासून राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. हे अधिवेशन 30 जूनपासून18 जुलैपर्यंत असणार आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राज्यातील विविध प्रश्नांवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.

विधिमंडळ अधिवेशनात विरोधक अनेक मुद्द्यांवरून सत्ताधारी पक्षाला घेराव घालण्याची तयारीत आहेत. काल पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी पक्षाकडून चहापानाचा कार्यक्रम झाला यावर विरोधकांकडून बहिष्कार टाकण्यात आला.

हिंदी भाषा सक्तीवरून घेतलेला युटर्न, शक्तिपीठ महामार्ग, शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन, लाडकी बहीण तसेच विकासकामे यावरून विरोधक आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता असून उघडकीस आलेले भ्रष्टाचार आणि शेतकऱ्यांबाबत केलेले वक्तव्य याचा विरोधक समाचार घेणार आहेत. विविध मुद्यांवरुन पावसाळी अधिवेशन चांगलेच तापण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com