Maharashtra Assembly Monsoon Session
Maharashtra Assembly Monsoon Session

Maharashtra Assembly Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा; विरोधक विविध मुद्द्यांवरून सरकारला घेरणार?

राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन 30 जूनला सुरु झाले असून 18 जुलैपर्यंत असणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

(Maharashtra Assembly Monsoon Session) राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन 30 जूनला सुरु झाले असून 18 जुलैपर्यंत असणार आहे. आज पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा असून शेवटच्या आठवड्यातही विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत.

आज विधानसभेत ठाण्यातील माजीवडे येथील कांदळवण नष्ट करून अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. मात्र याकडे अद्याप महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि राज्य सरकारचे दुर्लक्ष असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तसेच विधान परिषदेत मुंबईतील स्वच्छतागृह, कबूतर खाणे बंद केल्यानंतरची परिस्थिती आणि कामगार मंडळातील अनियमितता यावर विरोधक सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधणार आहे.

यासोबतच संजय शिरसाट यांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणावरूनही विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा होणार असून शेतकऱ्यांना सरकारने नुकसान भरपाई आणि कर्जमाफी द्यावी अशी मागणी करण्यात येणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com