Maharashtra Assembly Monsoon Session
महाराष्ट्र
Maharashtra Assembly Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाचा तिसरा आठवडा सुरू; अद्याप विरोधी पक्षनेतेपदाची निवड नाही
राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन 30 जूनला सुरु झाले असून 18 जुलैपर्यंत असणार आहे.
(Maharashtra Assembly Monsoon Session) राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन 30 जूनला सुरु झाले असून 18 जुलैपर्यंत असणार आहे. आज पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा असून शेवटच्या आठवड्यातही विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत.
विधान परिषदेत आज महत्त्वाचे विषय मांडण्यात येणार आहेत. दुपारी शिक्षण विभाग आणि शेतकरी प्रश्नावर चर्चा होणार असल्याची माहिती मिळत असून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधक सरकारला घेरणार आहेत.
बोगस सोयाबीन बियाणे दिल्याने वर्ध्यातील शेतकरी त्रस्त झाला असून याप्रकरणात कंपनीवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. शेवटचे काही दिवस असूनही अद्याप विरोधी पक्षनेतेपदाची निवड झालेली नाही