महाराष्ट्र
Devendra Fadanvis : "त्यांना बाहेर घालवण्याची व्यवस्था...", देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
पाकिस्तानी नारिकांना दिलेले व्हिसाही आजपासून रद्द केले जातील.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात अनेक कठोर आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. भारत सरकारने दिलेल्या आदेशानुसार, पाकिस्तानी नागरिकांना आज भारत सोडण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्याचप्रमाणे पाकिस्तानी नारिकांना दिलेले व्हिसाही आजपासून रद्द केले जातील.
याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाकिस्तानी नागरिक महाराष्ट्रात असण्यावरुन भाष्य केले आहे. देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलताना म्हणाले की, "उलट-सुलट बातम्या करु नका. एकही पाकिस्तानी नागरिक बेपत्ता नाही. जितके पाकिस्तानी नागरिक होते ते सर्व सापडले आहेत आणि त्यांना बाहेर घालवण्याची व्यवस्था केली आहे. राज्यामध्ये एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही. आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत सर्व पाकिस्तानी नागरिकांना बाहेर पाठवण्यात येणार आहे".