Devendra Fadnavis
31 ACRES LAND ALLOTTED FOR GADCHIROLI ZILLA PARISHAD ON CM FADNAVIS’ INSTRUCTIONS

Devendra Fadnavis: गडचिरोली जिल्हा परिषदेसाठी 31 एकर जमीन, मुख्यमंत्री फडणवीसांची सूचना

Gadchiroli Development: गडचिरोली जिल्ह्यातील विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार जिल्हा परिषदेला सुमारे ३१ एकर शासकीय जमीन मंजूर करण्यात आली आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

गडचिरोली जिल्ह्यातील विकासकामांना चालना देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार गडचिरोली जिल्हा परिषदेला विविध प्रशासकीय, सार्वजनिक विकास प्रकल्पांसाठी विसापूर आणि सोनापूर येथील एकूण १२.७५ हेक्टर (सुमारे ३१ एकर) शासकीय जमीन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंजूर केली.

ही जमीन मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या नावे वर्ग करण्यात येणार असून, जमीन दोन वेगवेगळ्या भागात असून मौजा विसापूरमध्ये स.नं. ३४३/१ मधील २.७१ हेक्टर तर मौजा सोनापूर येथील स.नं. १३५/१ मधील १०.०४ हेक्टर अशी एकूण १२.७५ हेक्टर जमीन देण्यात येणार आहे.

ही जमीन भोगवटा मुल्यरहित आणि महसूल मुक्त किमतीने मंजूर करण्यात आली आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या तिजोरीवर कोणताही आर्थिक भार पडणार नाही. शासनाने ही जमीन मंजूर करताना काही महत्त्वाच्या अटी घातल्या आहेत. या निर्णयामुळे गडचिरोली जिल्हा परिषदेला प्रशासकीय किंवा सार्वजनिक सोयी-सुविधांच्या उभारणीसाठी हक्काची जागा उपलब्ध झाली असून, यामुळे जिल्ह्याच्या प्रलंबित प्रकल्पांना आता वेग मिळणार आहे अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

Summary
  • गडचिरोली जिल्हा परिषदेला १२.७५ हेक्टर शासकीय जमीन मंजूर

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार निर्णय

  • विसापूर व सोनापूर येथे जमीन उपलब्ध

  • भोगवटा मुल्यरहित व महसूल मुक्त जमीन; विकासकामांना गती

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com