छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केआरकेचं वादग्रस्त ट्विट, मुख्यमंत्र्यांनी दिले तातडीचे आदेश

छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केआरकेचं वादग्रस्त ट्विट, मुख्यमंत्र्यांनी दिले तातडीचे आदेश

करणी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त मजकूर लिहिण्यात आला आहे. या प्रकरणी सायबर विभागाचे आयजी यशस्वी यादव यांच्याशी संपर्क साधला आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

केआरके म्हणजेच कमाल आर खान हा मनोरंजन क्षेत्रातील एक वादग्रस्त व्यक्ती आहे. नेहमीच तो कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमी चर्चेत असताना बघायला मिळतो. आता त्याने छत्रपती संभाजी महाराजांवर आक्षेपार्ह पोस्ट केली आहे. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल ट्विट करत आता मात्र त्याने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. याप्रकरणी सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला आहे. अशातच आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केआरकेच्या ट्विटबद्दल आक्रमक भूमिका घेतली आहे.

केआरकेने विकिपीडियाच्या आधारे सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. विकीपीडियाशी संपर्क साधून वादग्रस्त मजकूर काढण्याचे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या प्रकरणी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त मजकूर लिहिण्यात आला आहे. या प्रकरणी सायबर विभागाचे आयजी यशस्वी यादव यांच्याशी संपर्क साधला आहे. विकिपीडिया संबंधित यंत्रणेशी संपर्क साधला आहे. यासाठी जी प्रक्रिया असेल ती केली जाईल असेही फडणवीस म्हणाले. अशा पद्धतीचा आक्षेपार्ह मजकूर असणं हे अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे ते तिथून काढून टाकण्यासाठीचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत. छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आदर्श आहेत, त्यांच्यासंदर्भात असले लेखन खपवून घेणार नाही",असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

नंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "विकिपीडियावरील मजकूर ठराविक लोकांना एडिट करता येतो. आम्हाला कल्पना आहे की ते भारतातून संचालित होत नाही. त्यांचे काही नियम आहेत. ज्यांच्याकडे त्याचे एडिटोरीयल राईट्स असतात, त्यांच्यासाठी ऐतिहासिक गोष्टींबद्दल लिहिण्यासाठी काही नियमावली आखली जाऊ शकते का? याबद्दल आम्ही चर्चा करणार आहोत. ओपन सोर्सवर अशा पद्धतीने ऐतिहासिक गोष्टी तोडून-मोडून लिहिणाऱ्यांविरोधात नियमावली तयार करा अशा सूचना आपण देऊ. सोशल मीडियाची भौगोलिक चौकट नसल्याने नियम आणखं कठीण आहे. दुसऱ्यांच्या स्वातंत्र्यावर घाला घालू शकत नाही", असंही फडणवीस म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com