Maharashatra Corona | सलग दुसऱ्या दिवशी नवीन रुग्णसंख्येत घट

Maharashatra Corona | सलग दुसऱ्या दिवशी नवीन रुग्णसंख्येत घट

Published by :
Published on

राज्यात सलग दुसऱ्या दिवशी कोरोना बाधित रुग्णसंख्येचा आकडा कमी आढळला आहे. त्याचबरोबर कोरोनामुक्त नागरिकांची संख्या देखील बाधित रुग्णांपेक्षा जास्त आढळून अली आहे. त्यामुळे आरोग्य विभागासह राज्य सरकारला काहीसा दिलासा मिळाला आहे.

गेल्या 24 तासात राज्यात 7 हजार 243 रुग्ण आढळून आले आहेत. तर 10 हजार 978 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. आतापर्यत एकूण 59 लाख 38 हजार 734 कोरोना बाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचेप्रमाण 96.21 टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज 196 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.4 टक्के एवढा आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com