Maharashtra Coronavirus Update
महाराष्ट्र
Maharashtra Coronavirus Update : कोरोना पुन्हा येतोय? राज्यात एका दिवसात 45 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
कोरोनाच्या या महामारीमुळे सारं जग सावरलेलं असतानाच आता पुन्हा हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याची माहिती मिळत आहे.
(Maharashtra Coronavirus Update ) कोरोनाच्या या महामारीमुळे सारं जग सावरलेलं असतानाच आता पुन्हा हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याची माहिती मिळत आहे.
कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनमुळे धोका वाढला असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्येमध्ये सौम्य वाढ होत असून 23 मे रोजी एकूण 45 नवीन रुग्णांची नोंद झाल्याची माहिती मिळत आहे.
22 मेपर्यंत मुंबईतील एकूण कोरोना रुग्णसंख्या 183 वर पोहोचली असून यामध्ये मुंबईत सर्वाधिक 35 रुग्ण, पुण्यात 4, कोल्हापूर व रायगड येथे 2 तर ठाणे व लातूर येथे 1 असे रुग्ण आढळून आले आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्या आणि सतर्क राहा, आणि लक्षणं आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या असं सांगण्यात येतं आहे.