Coronavirus Update
महाराष्ट्र
Coronavirus Update : कोरोनानं चिंता वाढवली; राज्यात कोरोनाच्या 34 नव्या रुग्णांची नोंद, तर एकाचा मृत्यू
कोरोनाच्या या महामारीमुळे सारं जग सावरलेलं असतानाच आता पुन्हा एकदा कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याची माहिती मिळत आहे.
(Coronavirus Update ) कोरोनाच्या या महामारीमुळे सारं जग सावरलेलं असतानाच आता पुन्हा एकदा कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याची माहिती मिळत आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना पाहायला मिळत आहे. सोमवारी राज्यात कोरोनाचे 34 नवे रुग्ण सापडले.
34 रुग्णांमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील 12 रुग्णांचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे. तसेच मुंबईमधील एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या 29 वर पोहोचली आहे.
कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनमुळे धोका वाढला असल्याचे पाहायला मिळत आहे. भारतातील अनेक राज्यांमध्ये कोविडच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसत आहे. काळजी घ्या आणि सतर्क राहा, आणि लक्षणं आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या असं सांगण्यात येतं आहे.