Maharashtra HSC Result 2025: राज्यात बारावीचा निकाल 91.88 टक्के, यंदाही कोकण विभाग अव्वल
महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला असून यंदाचा राज्याचा निकाल 91.88 टक्के लागला आहे. बोर्डाकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत निकालाची आकडेवारी जाहीर करण्यात आली.
यंदाही बारावीच्या निकालात कोकण विभागानं बाजी मारली असून 96.74 टक्के निकाल लागला आहे. तसेच यंदाही बारावीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली असून 94.58 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून मुलांची टक्केवारी 89.51 टक्के आहे.
विद्यार्थी आणि पालकांना mahresult.nic.in वर दुपारी 1 वाजल्यापासून निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 2025च्या बारावी परीक्षेसाठी 15,13,909 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.
विभागानुसार निकाल
कोकण : 96.74 टक्के
कोल्हापूर : 93.64 टक्के
मुंबई : 92.93 टक्के
पुणे : 91.32 टक्के
नाशिक : 91.31 टक्के
अमरावती : 91.43 टक्के
छत्रपती संभाजीनगर : 92.24 टक्के
नागपूर : 90.52 टक्के
लातूर : 89.46 टक्के