Maharashtra Interim Budget 2024: अर्थमंत्री अजित पवार आज मांडणार अंतरिम अर्थसंकल्प

अर्थमंत्री अजित पवार आज मांडणार अंतरिम अर्थसंकल्प
Published by :
Siddhi Naringrekar

अर्थमंत्री अजित पवार आज अंतरिम अर्थसंकल्प मांडणार आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वीचा हा अर्थसंकल्प असणार आहे. या अंतरिम अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अजित पवार कोणत्या मोठ्या घोषणा करणार याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे.

अर्थसंकल्पात राज्याची अर्थव्यवस्था 7.6 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे अर्थमंत्री अजितदादा आज कोणत्या घोषणा करतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com