Maharashtra Kesari : शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड तीन वर्षांसाठी निलंबित
पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहोळ हा यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा मानकरी ठरला. 67व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये पृथ्वीराज मोहोळ विजेता ठरला. यामध्ये शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड याला 3 वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे.
स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पैलवान पृथ्वीराज मोहोळ आणि पैलवान महेंद्र गायकवाड यांच्यात सामना झाला. पैलवान पृथ्वीराज मोहोळने महाराष्ट्र केसरी स्पर्धेची गदा पटकावली. त्यानंतर स्पर्धेच्या अंतिम फेरीत पंचांबरोबर वाद घातल्याने महेंद्र गायकवाडवर तीन वर्षांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली तर उपांत्य फेरीत मोहोळ विरुद्ध पैलवान शिवराज राक्षे यांच्यात सामना झाला आणि यामध्ये पृथ्वीराज मोहोळला पंचांनी विजेता घोषित केलं आणि त्यानंतर या सामन्यात देखील असाच वाद पाहायला मिळाला.
त्यानंतर संतापलेल्या शिवराज राक्षेनं पंचांशी वाद घालून लाथ देखील मारल्याचे पाहायला मिळत असून पाठ टेकलीच नसल्याचं म्हणत शिवराज राक्षेनं पंचांना लाथ मारली. त्यामुळे कुस्तीगीर परिषदेने शिवराज राक्षे याला तीन वर्षांसाठी निलंबित केलं आहे.