Local Body Election : राज्यात निवडणुकीची रणधुमाळी; उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू
थोडक्यात
राज्यात आजपासून निवडणुकीची रणधुमाळी
आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
2 डिसेंबरला 246 नगरपालिका,42 नगरपंचायत निवडणुका
(Local Body Election) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे.
राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. राज्यात यापूर्वी 2016 - 17 मध्ये नगरपालिकांसाठी निवडणूक पार पडली होती.2 डिसेंबरला 246 नगरपालिका, 42 नगरपंचायत निवडणुका होणार असून 3 डिसेंबर रोजी निवडणुकांचा निकाल लागणार आहे.
17 नोव्हेंबर हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असणार आहे. 10 ते 17 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असून 18 नोव्हेंबरला अर्जांची छाननी करण्यात येणार आहे तर 21 नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत.
