MLC Election : विजयानंतर बावनकुळे गळ्यात पडून रडले, फडणवीस म्हणाले…

MLC Election : विजयानंतर बावनकुळे गळ्यात पडून रडले, फडणवीस म्हणाले…

Published by :
Published on

नागपूर विधान परिषद निवडणुकीत (Nagpur MLC Election Results) भाजप उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी विजयाचा गुलाल उधळला आहे. "बावनकुळेंचा गॅप हा लेजस्लेटिव्ह गॅप होता, तो पार्टी गॅप नव्हता. पक्षामध्ये दोन सर्वोच्च पदं असतात. अध्यक्ष आणि महामंत्री… त्यातल्या महामंत्री पदावर बावनकुळेंनी काम केलं, करत आहेत. आता लेजिस्लेटिव्ह पार्टीमध्ये बावनकुळेंचं कमबॅक आहे. हा कमबॅक असा आहे की तो नेव्हर गो बॅक वाला कमबॅक. आहे", असं फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या (Maharashtra Vidhanprishad MLC Election Result Live 2021) नागपूर (Nagpur MLC) आणि अकोला वाशिम बुलडाणा (Akola Washim buldhana MLC) स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातील निवडणुकीची आज मतमोजणी झाली. या दोन्ही जागांवर महाविकास आघाडीचा सपशेल पराभव झाला आहे. नागपुरात चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसचा दणदणीत पराभव केला आहे तर अकोल्यात भाजप-आरएसएसच्या करेक्ट नियोजनापुढे सेनेचे बाजोरिया कमी पडले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com