Electricity Bill
Electricity Bill

Electricity Bill : राज्यभरातील महावितरणाच्या ग्राहकांना दिलासा; महावितरणाची वीज स्वस्त झाली

राज्यभरातील महावितरणाच्या ग्राहकांना दिलासा
Published on

थोडक्यात

  • राज्यभरातील महावितरणाच्या ग्राहकांना दिलासा

  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या हंगामात महावितरणची वीज झाली स्वस्त

  • महावितरणच्या बिलात जवळपास 12 टक्क्यांची कपात

(Electricity Bill) राज्यातील महावितरणाच्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. महावितरणची वीज स्वस्त झाली असल्याने राज्यभरातील ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महावितरणच्या बिलात जवळपास 12 टक्क्यांची कपात करण्यात आली असून 28 मार्चच्या आदेशानुसार तूर्तास बिल आकारणी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. वीज वापरानुसार प्रति युनिट ३५ ते ९५ पैसे एवढा इंधन अधिभार आकारला गेल्याने होता.

मात्र नोव्हेंबर महिन्यात हा इंधन अधिभार शून्यावर आणण्याचे आदेश महावितरणने जारी केले असल्याची माहिती मिळत आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com