Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीणचा हप्ता लवकरच मिळणार, प्रक्रिया सुरु

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीणचा हप्ता लवकरच मिळणार, प्रक्रिया सुरु

लवकरच पात्र महिलांना 1500 रुपये खात्यात जमा होणार आहेत.
Published by :
Shamal Sawant
Published on

महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर खात्यांमध्ये पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आता लवकरच पात्र महिलांना 1500 रुपये खात्यात जमा होणार आहेत. काही बहिणींच्या खात्यात ही रक्कम आली असून उर्वरित महिलांच्या खात्यात लवकरच ही रक्कम जमा होईल असे सांगण्यात आले आहे.

28 जून 2024 व दिनांक 3 जुलै 2024 रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार इतर कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ न घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत १५०० रुपये दरमहा सन्मान निधी वितरित करण्यात येतो. त्याचप्रमाणे पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी सन्मान योजनेतून सर्वसाधारणपणे दरमहा 1000 रुपये लाभ घेत असलेल्या 774148 महिलांना उर्वरित फरकाचे 500 रुपये सन्मान निधी म्हणून मिळतील.

लाडकी बहीण योजनेतून आतापर्यंत 9 हप्त्यांचे 13500 रुपये मिळाले आहेत. महिला व बालविकास विभागानं लाडकी बहीण योजनेतून एप्रिल महिन्यात किती महिलांना रक्कम दिली याची माहिती येत्या काही दिवसांमध्ये समोर येईल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुतीच्या विजयात महत्त्वाची ठरली होती.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com