Maharashtra Municipal Election Results : आज मतमोजणी; कोण गड राखणार? दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Maharashtra Municipal Election Results ) महानगरपालिकांसाठी काल मतदान पार पडलं. सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आणि संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता आला.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, पिंपरी–चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली–मिरज–कुपवाड, नाशिक, मालेगाव, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड–वाघाळा, परभणी, जालना, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर, चंद्रपूर, उल्हासनगर, कल्याण–डोंबिवली, भिवंडी–निजामपूर, मीरा–भाईंदर, वसई–विरार, पनवेल या 29 महानगरपालिकांमध्ये काल मतदान पार पडलं.
आज मतमोजणी पार पडणार असून सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात होणार आहे. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. पालिकांवर कोणाचा दबादबा राहणार हे आज स्पष्ट होणार असून आता कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
Summary
राज्यातील 29 महापालिकेच्या निवडणुकांचा आज निकाल
पालिकांवर कोणाचा दबादबा राहणार स्पष्ट होणार
सकाळी 10 वाजेपासून सुरु होणार मतमोजणी
