Maharashtra Political Crisis Live | एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री तर फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाची घेतली शपथ

Maharashtra Political Crisis Live | एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री तर फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाची घेतली शपथ

महाराष्ट्रातील राजकीय सत्तासंघर्षाचा आज दहावा दिवस आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केलं आणि राज्यातील सत्तासंघर्षाची सुरुवात झाली. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री पदाचा त्याग केला आणि गेल्या अडीच वर्षांपासून महाराष्ट्रात सत्तेत असलेलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं. आतापर्यंत राज्यातील राजकीय नाट्यात काय-काय घडलं, जाणून घ्या ...
Published by :
Shweta Chavan-Zagade

फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीसाठी तयार

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी माध्यमांशी बोलतांना नवीन माहिती दिली. देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री व्हावे, अशी सूचना त्यांना केली आहे. तसेच माध्यमांसमोर त्यांनी आवाहन केले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी टि्वट करत पक्षाच्या आदेशाचे पालन करत आपण उपमुख्यमंत्री होत असल्याचे सांगितले. त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी राजभवनात झाला.

एकनाथ शिंदे राज्याचे नवे मुख्यमंत्री.

पहिल्यादा राज्यात मुख्यमंत्रीपदाचा त्याग भाजपने महाराष्ट्रात करत कमी आमदार असणाऱ्या एकनाथ शिंदे गटाच्या गळ्यात टाकली. विशेष म्हणजे या मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस राहणार नाहीत. तर, एकनाथ शिंदे यांचा आजच शपथविधी होणार आहे.

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे राजभवनावर दाखल

अखेर ठरलं! आज सात वाजता फडणवीस-शिंदे सरकारचा शपथविधी

एकनाथ शिंदे यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद होण्याची शक्यता

गाड्याचा ताफा आता वरळी सी लिंक वरून हा ताफा निघाला आहे. त्यांच्या ताफ्यात साधारण ९ गाड्या आहेत. एकनाथ शिंदे दहा दिवसांनी मुंबईत दाखल झाले आहेत. थोड्यात वेळात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे.

भाजप शिंदे गटाचा शपथविधीचा मुहूर्त ठरला, आज सायंकाळी शपथविधी होण्याची शक्यता 

शपथविधीचा मुहूर्त ठरला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे. उद्या शपथविधी होणार आहे. सहा नवे मंत्री कोण असतील अशी चर्चा आहे. दुपारी तीन वाजता राज्यपालांना भेटणार आहेत.

एकनाथ शिंदे मुंबईत दाखल

एकनाथ शिंदे यांना केंद्राची झे दर्जाची सुरक्षा, मुंबई विमानतळावर पोलीस सुरक्षा वाढवली 

एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून शिंदे यांना झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून शिंदे यांना सुरक्षा देण्यात आली. एकनाथ शिंदे यांचे गोव्याहून मुंबईकडे प्रयाण झाले आहे. महाराष्ट्रातला राजकीय विरोध लक्षात घेऊन केंद्रीय गृह मंत्रालयाकडून झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.

काँग्रेस नेते उद्धव ठाकरेंच्या भेटीला मातोश्रीवर दाखल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर रात्री शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांची बैठक पार पडली. जवळपास तासभर ही बैठक चालली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडी सरकार स्थिर असल्याचा दावा केलाय.

उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्याचा आनंद आम्हाला नाही - एकनाथ शिंदे

मुंबईत गेल्यांतर मी पुढची रणनिती ठरवेन आणि मग बोलेन. दोन रेझोल्यूशन केलेले आहेत. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्याचा आनंद आम्हाला नाही. शिवसेनेच्या आमदारांच्या मतदार संघातल्या लोकांची त्या आमदारांची भाजपसोबत जाण्याची इच्छा होती. उद्धव साहेबांच्या बद्दल कालही आदर होता, आजही आदर आहे.

एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री झालेलं पहायचं आहे.. गावकऱ्यांनी केली इच्छा व्यक्त..

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील तळदेव येथे कोयना, सोळशी, कांदाटी विभागातील ग्रामस्थांनी एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ घोषणा देऊन त्यांना पाठिंबा दिला आहे.. जावली येथील दरे हे एकनाथ शिंदे यांचे मूळ गाव असून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत असलेल्या आमदारांनी घेतलेला निर्णय हा महाराष्ट्र हिताचा असून या निर्णयामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री झालेले पहायचं आहे अशी भावना येथील ग्रामस्थ व्यक्त करत आहेत..

खासदार उदयनराजे भोसले मुंबईच्या दिशेने रवाना

सातारा- राज्यातील महाविकास आघाडी सरकार शिवसेनेच्या 40 आमदारांच्या बंडानंतर कोसळले.. भाजप सरकार स्थापन करण्यासाठी राज्यातील सर्वच नेते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.. यातच मराठ्यांची राजधानी सातारा येथील राज्यसभेचे भाजपच्या खासदार उदयनराजे भोसले देखील साताऱ्यातून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.. भाजपचे सरकार येणार असल्याने सातारा जिल्ह्यात भाजपच्या गोटात कमालीचा आनंद व्यक्त होत आहे.. यात भाजपचे समर्थक आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत.. उदयनराजेंचा गाड्यांचा ताफा आज मुंबईच्या दिशेने सातारा राष्ट्रीय महामार्ग वरून दिसून आला..

ठाकरे सरकार सत्तेवरून पायउतार झाल्याने एसटी कर्मचाऱ्यांचा आनंदोत्सव

बीड- ठाकरे सरकार सत्तेवरून पाय उतार झाल्याने एसटी कर्मचाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केलाय. बीडच्या माजलगाव एसटी डेपोतील कर्मचाऱ्यांनी फटाके आणि पेढे भरवत हा आनंद एसटी डेपोत साजरा केलाय. पाच महिने विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू होतं. या आंदोलनात एसटी कर्मचाऱ्यांचे शासनात विलीनीकरण झालंच नाही. त्यामुळे आजही एसटी कर्मचा-यांची ही मागणी कायम आहे. अखेर ठाकरे सरकार सत्तेतून पायउतार झाल्यानं एसटी कर्मचाऱ्यांचा विजय झाला असं म्हणत कर्मचाऱ्यांनी हा आनंद साजरा केला. दरम्यान यावेळी थोर महापुरुषांच्या नावानं घोषणा देण्यात आल्या आहेत.

उद्धवजी ठाकरे साहेबांनी राजीनामा दिल्यानंतर सेलिब्रेशन केलं नाही - दीपक केसरकर

उद्धवजी ठाकरे साहेबांनी राजीनामा दिला आहे. असं चित्र निर्माण केलं गेलं, की इथं बंडखोरांनी सेलिब्रेशन केलं. पण आम्ही कोणतही सेलिब्रेशन केलेलं नाही. ठाकरे आमचे नेते होते आणि आहेत, राहतील. त्यांचं मन दुखवावं आणि त्यांचा अपमान व्हावा असा कोणताही आमचा उद्देश नव्हता. आमच्या नेत्यासोबत आम्हाला अप्रत्यक्षपणे लढावं, लागलं, याचं दुःख आमच्या मनात आहे

भाजपसोबत कोणती आणि किती मंत्रीपदे याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, लवकरच होईल. तोपर्यंत कृपया मंत्रिपदाच्या याद्या आणि याबाबत पसरलेल्या अफवा यावर विश्वास ठेवू नका, असे एकनाथ शिंदें यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.  

शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि भाजपमध्ये आधीपासूनच छुपी युती होती, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा आरोप 

आजपासून काँग्रेस विरोधी पक्षाच्या भूमीकेत – नाना पटोले

महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार – नाना पटोले 

उद्या दुपारनंतर ईडी कार्यालयात हजर होणार - संजय राऊत 

देवेंद्र फडणवीस उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता

देवेंद्र फडणवीस 1 जुलै रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊ शकतात, मुंबईत आज फडणवीस यांच्या सागर बंगल्यात भाजप कोअर कमिटीची बैठक होणार आहे, यात महाराष्ट्र भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते सहभागी होणार आहेत, दरम्यान, फडणवीस आणि एकनाथ शिंदे हेच भविष्य ठरवतील, असे भाजपचे महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले

काँग्रेस आमदारांची विधान भवनात बैठक

उद्धव ठाकरे आज राजीनामा देणारं आहेत याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना माहिती नव्हतं. ज्यावेळी उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातुन घोषणा केली त्यावेळी मला आणि शरद पवार यांना माहिती मिळाली. शरद पवार यांना याचं आश्चर्य वाटलं, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिलीय. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्यापूर्वी शरद पवार यांना त्याची माहिती दिली नव्हती आणि ती का दिली नव्हती? असा प्रश्न विचारला जातोय. 

ठाकरे सरकार कोसळताच बच्चू कडूंना रस्ते घोटाळ्यात क्लीन चिट! 

महाराष्ट्रात नवीन सरकार येणार ... 

पुन्हा एकदा मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, भाईंदर, वसई, नवी मुंबई, पनवेल, मेट्रो रेल्वेचे काम पुन्हा जलद गतीने सुरू होईल.

फडणवीसांना शुभेच्छा देणारे बॅनर युवा सेनेने फाडले, सेना भाजप संघर्ष वाढणार

भाजपच्या विधिमंडळ पक्षाची आज महत्वपूर्ण बैठक,  देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी या ठिकाणी ही बैठक होणार आहे 

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com