Sushma Andhare on Sudhakar Badgujar : भाजपमध्ये बडगुजर प्रवेशावरून सुषमा अंधारे यांचा ट्विटमधून जोरदार निशाणा

शिवसेना प्रवक्त्या अंधारे यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ
Published by :
Shamal Sawant

भाजपमध्ये नुकताच झालेला सुधाकर बडगुजर यांचा प्रवेश सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी भाजपवर निशाणा साधत एक विवादास्पद ट्विट केलं आहे. अंधारे यांच्या या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी ट्विट करत बडगुजर यांच्या पक्षप्रवेशावरून भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटमध्ये असे म्हटले आहे – सलीम कुत्ताच्या पार्टीतला बडगुजरसारख्या पापी जिवातम्यांचा हैदोस बघून भाचा नितेश राणेचे पित्त खवळले होते. यावर 52 कुळी उपाय म्हणून तत्परता दाखवत "सुधाकर"ला सुधारक ठरवण्याचा विडा हाती घेतला.

बडगुजर यांचा प्रवेश का वादग्रस्त?

सुधाकर बडगुजर हे पूर्वी शिवसेनेत होते. त्यांच्यावर काही गंभीर आरोपही लावले गेले होते. मात्र, आता ते थेट भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर विरोधकांकडून टीका सुरू झाली आहे. विशेषतः सुषमा अंधारे यांचा आरोप आहे की, ज्यांच्यावर भाजपने पूर्वी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं, त्यांनाच आता पक्षात घेतलं जातंय.

राजकीय वर्तुळातील प्रतिक्रिया

सुषमा अंधारे यांच्या ट्विटमुळे अनेकांनी सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जणांनी त्यांच्या भाषेवर टीका केली आहे, तर काहींनी त्यांच्या मुद्द्यांना समर्थन दिलं आहे. मात्र भाजपकडून अद्याप यावर अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com