Maharashtra Rain
महाराष्ट्र
Maharashtra Rain : राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कमी राहणार; काय आहे हवामान विभागाचा अंदाज?
राज्यातील अनेक भागात काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे.
(Maharashtra Rain ) राज्यातील अनेक भागात काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. मात्र आता राज्यात पावसाचा जोर कमी होणार असल्याची माहिती मिळत आहे. पुढील काही दिवस पावसाचा जोर कमी राहणार आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विदर्भात पुढील काही दिवस पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.त्यानंतर पुढील काही दिवस पावसाचा जोर कमी होणार आहे.
कोकण, गोवा विभागात 18 जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. जून आणि जुलै महिन्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे तर मराठवाड्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्याचे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार समजते.