Maharashtra Rain
Maharashtra Rain

Maharashtra Rain : राज्यातील काही भागात आज मुसळधार पाऊस; कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट, हवामान विभागाचा अंदाज

गेल्या अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे.
Published on

(Maharashtra Rain) गेल्या अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. राज्यात अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.राज्यभरात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असून दोन कोकण किनारपट्टीसह पुणे, सांगली, सातारा व मराठवाड्यातही पावसाचा जोर वाढला आहे.

आज राज्यात अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भ लगतच्या पूर्व मराठवाड्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, तर उर्वरित मराठवाडा आणि खानदेशात देखील पावसाचा अंदाज आहे.

यासोबतच चंद्रपूर जिल्ह्याला हवामान विभागाने रेड अलर्ट दिला असून त्याच पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन केलं आहे. मुसळधार पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यासोबतच गडचिरोलीत जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला असून वर्धा जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट असून मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com