Maharashtra Rain Update
महाराष्ट्र
Maharashtra Rain Update : मुसळधार ते अतिमुसळधार; पुढील 2-3 दिवस 'या' भागात जोरदार पावसाचा इशारा
गेल्या काही दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे.
(Maharashtra Rain Update ) गेल्या काही दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. आता पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. विविध भागांत मुसळधार पाऊस पडत आहे.
राज्यात पावसाचा जोर कायम असून हवामान विभागाने विविध जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा दिला आहे. पुढील दोन ते तीन दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट भागात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाट, कोकण, साताऱ्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून मुंबई, ठाण्यात पावसाच्या मध्यम सरी कोसळणार असून पुढील दोन दिवसात मराठवाड्याच्या काही भागात वीज आणि वादळांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.