Maharashtra Weather Update : पुढील तीन ते चार दिवस राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार
(Maharashtra Weather Update ) काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती यातच आता पुन्हा पावसाला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यभरात पावसाचा जोर कायम असून हवामान विभागाने विविध जिल्ह्यांत पावसाचा इशारा दिला आहे.
राज्यातील बहुतांश भागात पावसाने दमदार हजेरी लावली असल्याचे पाहायला मिळत आहे.अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे नदी, नाले तुडुंब भरुन वाहत आहेत. पुढील तीन ते चार दिवसात पावसाच जोर आणखी वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासोबतच कोकण, विदर्भातही मुसळधार पावसाची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून याचाच परिणाम म्हणून राज्यात शुक्रवारपासून मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जोरदार वाऱ्यांसह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून काही ठिकाणी अतिवृष्टीचा देखील इशारा देण्यात आला आहे.