Maharashtra Rain
महाराष्ट्र
Maharashtra Rain : राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट?
राज्यभरात पावसाचा जोर कायम असून हवामान विभागाने 12 जून पासून विविध जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा दिला आहे. दिला आहे.
(Maharashtra Rain ) राज्यभरात पावसाचा जोर कायम असून हवामान विभागाने 12 जून पासून विविध जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा दिला आहे. काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. यातच आता आजपासून पुन्हा पावसाला सुरुवात होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
राज्यात पावसाचा अलर्ट देण्यात आला असून राज्यात विजांसह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला असून आज कोल्हापूर, सांगलीत जोरदार पावसाची शक्यता असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कोकणात आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून रत्नागिरीला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यात विजांसह जोरदार पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.