Maharashtra Weather Update
Maharashtra Weather Update

Maharashtra Weather Update : राज्यातील 'या' भागात पुढील 4 दिवस जोरदार पाऊस बरसणार

राज्यात ठिकठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे.
Published on

( Maharashtra Weather Update) राज्यात ठिकठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. विविध भागांत मुसळधार पाऊस झाल्याने शेतीचे नुकसान झाले आहे. आता राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाराष्ट्रात पुढील 4 दिवस दमदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

आज कोकण किनारपट्टीसह मुंबई, ठाण्याला अलर्ट जारी करण्यात आला आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला महाराष्ट्रात पावसाचा हायअलर्ट देण्यात आला असून मराठवाड्यातही जोरदार पावसाची शक्यता आहे.

जळगाव, छत्रपती संभाजी नगर, अहिल्यानगर, बीड जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट असून वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदियातही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून पुणे सातारा आणि कोल्हापूरच्या घाट परिसरातही जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com