Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांना निलंबित करण्याची मागणी, अधिवेशनात भाजप आमदार कृष्णा खोपडे मांडणार लक्षवेधी, कारण काय?
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Tukaram Munde ) तुकाराम मुंढे यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात येत असून अधिवेशनात भाजप आमदार कृष्णा खोपडे याबाबत अधिवेशनात लक्षवेधी मांडणार असल्याची माहिती मिळत आहे.
भाजप आमदार हिवाळी अधिवेशनात आयएएस तुकाराम मुंढे यांच्या विरोधातील दोन जुन्या गंभीर प्रकरणांना पुन्हा उजाळा देत त्यांच्या निलंबनाची विशेष लक्षवेधी सूचना मांडणार असून खोपडे यांनी दावा केली आहे की, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त असताना नियमबाह्य पद्धतीने स्मार्ट सिटी प्रकल्पाचा प्रभार घेतला तसेच शासनाकडून सीईओ म्हणून औपचारिक नेमणूक नव्हती तरी अधिकार नसताना स्मार्ट सिटीवर स्वतः नियंत्रण घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
तसेच महिला अधिकाऱ्यांना दमदाटी आणि वर्तणुकीबाबत तक्रार करण्यात आली असून त्या वेळी महाविकास आघाडी सरकार असल्याने कारवाई करण्यात आली नसल्याचा भाजपने आरोप केला आहे.
Summery
तुकाराम मुंढे यांना निलंबित करण्याची मागणी
अधिवेशनात भाजप आमदार कृष्णा खोपडे मांडणार लक्षवेधी
तुकाराम मुंढे यांच्या विरोधातील दोन जुन्या गंभीर प्रकरणांना पुन्हा उजाळा देत त्यांच्या निलंबनाची विशेष लक्षवेधी सूचना मांडणार
