औंढा नागनाथ येथील महाशिवरात्रीची यात्रा महोत्सव रद्द

औंढा नागनाथ येथील महाशिवरात्रीची यात्रा महोत्सव रद्द

Published by :
Published on

बारा लिंगा पैकी आठवे ज्योतिर्लिंग हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे महाशिवरात्री महोत्सवानिमित्त मोठी यात्रा भरते. हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच जात आहे. या पार्श्वभूमीवर यात्रा रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी हे आदेश दिले आहेत. या यात्रेस भाविकांची गर्दी असते. औंढा नागनाथ संस्थानच्यावतीने महाशिवरात्री महोत्सवाची संपूर्ण तयारी करण्यात आली होती. 9 ते 14 मार्च या कालावधीमध्ये हा महोत्सव पार पडणार होता. मात्र, आता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे हा महोत्सव रद्द करण्यात आला आहे.

देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेले औंढा नागनाथ येथे दरवर्षी मोठ्या उत्साहात महाशिवरात्रीची यात्रा भरत असते रथ उत्सव कार्यक्रम यात्रेतील प्रमुख आकर्षण असून नागनाथ मंदिरात होणाऱ्या या कार्यक्रमात सुमारे दोन लाख भाविकांची उपस्थिती असते मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा रद्द करण्यात आली आहे. सध्या मंदिरात दर्शन सुरू असून कोरोना नियमाचे पालन करून भाविकांना दर्शनासाठी मंदिरात सोडण्यात येत आहे.

हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसापासून कोरोना रुग्णसंख्येत अचानक वाढ झाली आहे. सध्या 140 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत 3 हजार 755 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता हिंगोली प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com