शेतकऱ्यांसह,सर्व सामान्यांना दिलासा;वीज कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे

शेतकऱ्यांसह,सर्व सामान्यांना दिलासा;वीज कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे

Published by :

गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेला वीज कर्मचाऱ्यांचा संप (Mahavitran worker strike) अखेर मागे घेण्यात आला आहे. वीज कर्मचाऱ्यांची ऊर्जामंत्र्यांसोबत (Nitin Raut) बैठक पार पडली. या बैठकीस ऊर्जामंत्र्यांच्या लेखी आश्वसनानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

वीज कर्मचाऱ्यांच्या संपामुळे (Mahavitran worker strike) राज्यात अनेक ठिकाणी अंधार पसरला (Power Outage) होता. या संपावर तोडगा काढण्यासाठी वीज कर्मचाऱ्यांची ऊर्जामंत्र्यांसोबत आज (Nitin Raut) बैठक पार पडली. या बैठकीत संपकरी वीज कर्मचाऱ्यांनी (Mahavitran worker strike) विविध मुद्दे ठेवले. नोकरभरती ही जाहीरातीच्या माध्यामातून होते. तसेच कंत्राटी कामगारांच्या बाबतीत व्हावे अशीही मागणी त्यांनी ठेवली आहे. त्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली आहे.

आमचे आंदोलन हे केद्र शासनाच्या नव्या बिलाविरोधात होते. यावर ऊर्जामंत्र्यांनी राज्य सरकारची भूमिका कळवत शासनाने विरोध केला आहे. 2003 च्या सुधारीत बिलाविरोधात वीज कर्मचारी आक्रमक झाले आहेत. तसेच खासगीकरणाबाबत कोणताही प्रस्ताव सध्या नाही. मात्र केंद्राच्या तशा धोरणाला विरोध असेल असे यावेळी कर्मचारी संघटनांकडून सांगण्यात आलंय. केद्र सरकारडून खासगीकरणाचा घाट घातला जातोय, असा आरोप वीज कर्मचाऱ्यांकडून होत आहे. त्यामुळे हा संप सुरू झाला होता. मात्र राज्याने आपली भूमिका याविरोधात असल्याचे आश्वासन आज वीज कर्मचाऱ्यांना दिले आहे. त्यानंतर वीज कर्मचाऱ्यांनी आपल्या भूमिकेत बदल करत हा संप मागे घेत असल्याची घोषणा केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com