Ravindra Chavan
Ravindra Chavan

Ravindra Chavan : कोल्हापूरात महायुतीच्या प्रचार मोहिमेचा रविंद्र चव्हाणांच्या उपस्थितीत शुभारंभ

आजपासून उमेदवारांच्या प्रचार फेरी, सभांना सुरुवात होईल.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Ravindra Chavan) 29 महापालिकांची निवडणूक अर्ज मागे घेण्याची मुदत आता संपली असून आज निवडणूक चिन्हं आणि अंतिम उमेदवार यादी जाहीर केली जाणार आहे. आजपासून उमेदवारांच्या प्रचार फेरी, सभांना सुरुवात होईल. अनेक ठिकाणी स्थानिक नेते आणि प्रमुख नेत्यांच्या सभा होतील.

याच पार्श्वभूमीवर आज कोल्हापुरात महायुतीच्या प्रचार मोहिमेचा शुभारंभ होणार आहे. रविंद्र चव्हाणांच्या उपस्थितीत हा शुभारंभ होणार असून शंखनाद विजयाचा हे घोषवाक्य घेऊन आज कोल्हापुरात महायुतीच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ केला जाणार आहे.

यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री प्रकाश आबिटकर , आमदार राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार अमल महाडिक यांच्यासह महायुतीचे नेते उपस्थित राहणार आहेत .

Summary

  • कोल्हापुरात महायुतीच्या प्रचार मोहिमेचा आज शुभारंभ

  • रविंद्र चव्हाणांच्या उपस्थितीत शुभारंभ होणार

  • चंद्रकांत पाटील, हसन मुश्रीफ होणार प्रचारात सहभागी

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com