महाराष्ट्र
उद्या महायुतीचा शपथविधी तर महाविकास आघाडीचे ईव्हीएमविरोधात राज्यभर आंदोलन
पुण्यासह राज्यातील महत्त्वाच्या शहरात आंदोलनाची हाक
थोडक्यात
महाविकास आघाडीचं उद्या ईव्हीएमविरोधात आंदोलन
मविआकडून ईव्हीएमविरोधात उद्या राज्यभर आंदोलन
पुण्यासह राज्यातील महत्त्वाच्या शहरात आंदोलनाची हाक
निवडणुकांचे निकाल लागले असून उद्या महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. मात्र सत्ताधाऱ्यांनी ईव्हीएममध्ये घोटाळा केल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडी उद्या ईव्हीएमविरोधात आंदोलन करणार आहे.
एकीकडे महायुतीचा शपथविधी तर दुसरीकडे ईव्हीएमविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. उद्या राज्यभर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
पुण्यासह राज्यातील महत्त्वाच्या शहरात आंदोलनाची हाक देण्यात आली असून महायुतीचा शपथविधी असतानाच महाविकास आघाडीकडून हे आंदोलन केलं जाणार असल्याची माहिती मिळत आहे.