Mahapalika Election Results : महापालिका निवडणुकीत महायुतीची बाजी; 29 पैकी 24 पालिकांवर महायुतीची सत्ता
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Mahapalika Election Results ) महापालिका निवडणुकांच्या मतदानानंतर काल मतमोजणी पार पडली. मुंबई महानगर पालिका निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळाल्याचे पाहायला मिळत आहे.29 महानगरपालिकांमध्ये भाजपा-शिवसेनेच्या महायुतीने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत.
मुंबई महानगर पालिका निवडणुकीचा निकाल हाती आला असून यामध्ये भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे. महापालिका निवडणुकीत महायुतीने बाजी मारली असून 29 पैकी 24 पालिकांवर महायुतीची सत्ता आल्याचे पाहायला मिळत आहे. ठाकरे-पवार आणि काँग्रेसचा धुव्वा उडाला आहे.
भाजपने जवळपास ९ महापालिकांमध्ये स्वबळावर सत्ता गाठली. . पुणे-पिंपरी चिंचवडमध्येही भाजपने आपले एकहाती वर्चस्व सिद्ध केलं यामुळे राष्ट्रवादीला त्याठिकाणी मोठा धक्का बसल्याचे पाहायला मिळत आहे.
Summary
29 महापालिकांच्या निवडणुकीत महायुतीचीच बाजी
29 पैकी 24 पालिकांवर महायुतीची सत्ता
ठाकरे-पवार आणि काँग्रेसचा राज्यभरात धुव्वा
