ठाणे-घोडबंदर रोडवर गॅस टँकरचा मोठा अपघात

ठाणे-घोडबंदर रोडवर गॅस टँकरचा मोठा अपघात

Published by :
Published on

लोकशाही न्यूज नेटवर्क | मुंबईला लागून असलेला ठाणे घोडबंदर रोडवर गॅस टँकरचा मोठा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र घटनेने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. दरम्यान या पलटी झालेल्या गॅस टँकरला उभा करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

ठाणे घोडबंदर रोडवर मध्यरात्रीच्या सुमारास गॅस टँकर पलटी झाल्याची घटना घडली होती. सुदैवाने अपघातात टँकर चालक सुखरूप वाचला आहे. मात्र मध्यरात्री काही तास ठाणे-घोडबंदर रोडवर वाहतूक कोंडी झाली होती.

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची 1 गाडी, वाहतूक पोलिसांची 1 रेस्क्यू व्हॅन आणि क्रेन मशिन दाखल झाली होती. क्रेन मशिनच्या सहाय्याने या टँकरला उभा करण्यात आले. त्यानंतर रस्ता धुवून वाहतूक कोंडी सोडविण्यात आली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com