Raigad
Raigad

Raigad : रायगडच्या महाडमध्ये अमली पदार्थाविरोधात मोठी कारवाई; पोलिसांनी 88 कोटी 92 लाखांचा मुद्देमाल केला जप्त

रायगडच्या महाडमध्ये अमली पदार्थाविरोधात मोठी कारवाई केली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

(Raigad) रायगडच्या महाडमध्ये अमली पदार्थाविरोधात मोठी कारवाई केली आहे. विनापरवाना अमली पदार्थ बनवणाऱ्या महाड MIDC तील कारखान्यावर कारवाई करण्यात आली असून यामध्ये 88 कोटी 92 लाख रुपये किंमतीचा किटामाईन हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.

अमली पदार्थ बनवणाऱ्या कारखान्यावर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. महाड MIDC पोलिस, स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखा रायगड आणि अमली पदार्थ विरोधी पथकाने हि एकत्रीत कारवाई केली आहे. या प्रकरणी 4 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

ही कंपनी अमली पदार्थ बनवत असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना होती. या माहितीच्या आधारे कारवाई करण्यात आली आहे. अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा 1985 मधील तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून महाड MIDC पोलीस या प्रकरणात अधिक तपास करीत आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com