एनआयएची मोठी कारवाई; 44 ठिकाणांवर एनआयएच्या धाडी

एनआयएची मोठी कारवाई; 44 ठिकाणांवर एनआयएच्या धाडी

पुण्यात सापडलेल्या दहशतवादी प्रकरणानंतर पडघा गावातून दोन ते तीन जणांना करण्यात अटक आली होती.
Published by :
Siddhi Naringrekar

पुण्यात सापडलेल्या दहशतवादी प्रकरणानंतर पडघा गावातून दोन ते तीन जणांना करण्यात अटक आली होती. यातच आता आणखी काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. एनआयएने 13 ते 14 लोकांना ताब्यात घेतले आहे.

कर्नाटकमध्येही एनआयएच्या पथकाकडून छापेमारी सुरु आहे. एनआयएनं देशभरात 44 जागांवर एनआयएनं धाडी टाकल्या आहेत. एनआयएनं आयसीसवर मोठी कारवाई केली आहे. पुणे दहशतवादी प्रकरणात शामिल नाचनला व अतिफ नाचन पडघा गावातून अटक करण्यात आली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

तसेच आता महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, तेलंगणा आणि इतरांसह अनेक राज्यांमध्ये दहशतवादी कारवाया करण्याचा कट रचला असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे कर्नाटकातही छापेमारी सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com