लॉकडाऊनमध्ये पोलिसांची मोठी कारवाई; संपूर्ण बारच केला भुईसपाट

लॉकडाऊनमध्ये पोलिसांची मोठी कारवाई; संपूर्ण बारच केला भुईसपाट

Published by :
Published on

मीरा-भाईंदरमध्ये लॉकडाऊन असताना देखील चोरी-छुप्प्याने बार चालवला जात होता. हा बार अनधिकृत असल्याने पोलिसांकडून पालिकेला तोडक कारवाई पत्र दिले होते. त्यानुसार आज या बारवर बुलडोझर फिरवण्यात आला.

काशीमिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मानसी बार हा राञी चोरी छुपे सुरु ठेवत होता. या बारमध्ये मुली लपवण्यासाठी तयखाना ही तयार करण्यात आला होता. दरम्यान हा बार अनधिकृत होता. त्यामुळे या बारवर कारवाई करण्याचे पत्र पोलिसांकडून पालिकेला देण्यात आले होते. त्यावर आज मिरा भाईंदर पालिकेनं अनधिकृत पथकासह मानसी लेडीज बार भुईसपाट करुन टाकलं.

दरम्यान गेल्या आठवड्यात काशिमीरा पोलिसांनी रात्री तीनच्या सुमारास मानसी लेडीज बार मध्ये धाड टाकून मोठी कारवाई केली होती. या कारवाईत 7 मुलींसह 2 तृतीयपंथीयांचे सुटका करण्यात आली. तर ग्राहक आणि स्टाफसहित 19 आरोपींना अटक ही करण्यात आलं होतं.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com