Maharashtra Politics
Maharashtra Politics

Maharashtra Politics: मोठा राजकीय ट्विस्ट! महापौरपद शिंदे गटाकडे जाणार? भाजपला मोठा धक्का

Shinde Group: महापालिका निकालानंतर महाराष्ट्रातील राजकारणाला नवे वळण मिळाले आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

शुक्रवारी लागलेल्या महापालिका निवडणुकीत भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला. मुंबई महानगरपालिकेत भाजपने दणकट यश मिळवत ८९ जागा जिंकल्या, तर शिवसेना (शिंदे गट) ला २९ जागा मिळाल्या. मात्र, भाजपकडे एकट्याचे स्पष्ट बहुमत नसल्याने महापौरपदासाठी शिंदे गटाची मदत अपरिहार्य आहे. यामुळे मुंबईत महापौर कोणाचा होणार, भाजपचा की शिवसेना शिंदे गटाचा, याबाबत उत्सुकता आहे.

आता अशीच स्थिती उल्हासनगर महापालिकेत आहे, जिथे वंचित बहुजन आघाडी किंगमेकरच्या भूमिकेत आहे. उल्हासनगर निवडणुकीत शिंदे शिवसेना, टीम ओमी कलाणी व साई पक्षांच्या गठबंधनाला ३७ जागा मिळाल्या, तर भाजपलाही समान ३७ जागा लाभल्या. बहुमताचा आकडा ३९ असल्याने दोन्ही बाजूंना दोन नगरसेवकांची गरज आहे. शिवसेना व भाजप दोन्ही पक्षांनी 'आमचाच महापौर होणार' असा दावा केला आहे.

सूत्रांनुसार, वंचित बहुजन आघाडी शिंदे गटाला पाठिंबा देणार आहे. आघाडीचे दोन उमेदवार अज्ञातस्थळी गेले असून, यामुळे भाजपचे टेन्शन वाढले आहे. उल्हासनगरमध्ये महापौरपदासाठी चुरस पाहायला मिळेल, तर मुंबईत महायुतीतूनच महापौर निवडणूक होईल. या घडामोडींमुळे स्थानिक राजकारणात नव्या मोर्चेबांधण्या होण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com