दलित शक्तीला एकत्र येण्यासाठी भाजपा रोखतेय, मल्लिका ढसाळ यांचा आरोप
दलित पँथर फोडण्याच काम भाजपने केले आहे, प्रचंड ताकद एकत्र येणे सनातन वादाच्या दृष्टिकोनातून घातक गोष्ट आहे, त्यांना आपण एकत्र येणे हेच नको आहे.. दलित जनता एकत्र न येण्याचं काम भाजप करत आहे.. दलित शक्तीला एकत्र येण्यासाठी भाजप हा पक्ष रोखत आहे असे आरोप थेट मल्लिका ढसाळ यांनी केला आहे.राज्यस्तरीय कार्यकर्ता बैठकीत त्या ठाणे येथे बोलत होत्या.
स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका बघता आता पुन्हा नव्याने दलित पँथर संघटनेच्या वतीने महाराष्ट्र भर संघटना मोठ्या ताकतीने वाढवणार असून, लोकांच्या हिताचे काम करणार असल्याचे नामदेव ढसाळ यांच्या दलित पँथर संघटनेच्या श्रेष्ठी पद्मश्री मल्लिका ढसाळ व नव्याने झालेले राष्ट्रीय अध्यक्ष रामभाऊ तायडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
तसेच यावेळी सत्ताधारी पक्षावर देखील निशाणा साधला. तर दुसरीकडे दलित पँथर फोडण्याचा काम भाजपने केले आहे ..प्रचंड ताकद एकत्र येणे सनातन वादाच्या दृष्टिकोनातून घातक गोष्ट आहे त्यांना आपण एकत्र येणे हेच नको आहे.. दलित जनता एकत्र न येण्याचं काम भाजप करत आहे.. दलित शक्तीला एकत्र येण्यासाठी भाजप हा पक्ष रोखत आहे असे थेट आरोप मल्लिका ढसाळ यांनी केले आहे.
ओबीसी आरक्षण बाबत राज्य आणि केंद्र सरकार एकमेकांवर चाल ढकल करत आहे..obc च्या मोठ्या नेत्यांनी राजीनामा द्यावा अशी देखील मागणी, दलित पँथरचे राष्ट्रीय अध्यक्ष रामभाऊ तायडे यांनी केली आहे..तसेच महाराष्ट्र भर दलित पँथर मोठ्या संख्येने ताकतीने उमेदवार देणार असून लोकांच्या मूळ प्रश्न मार्गी लावणार आहे..असे देखील दलित पँथर संघटनेच्या वतीने पत्रकार परिषदेत सांगण्यात आले आहे.