औरंगाबादेत देशातील ‘मंगलम वेडिंंग डेस्टिनेशन क्लब’ शुभांरभ

औरंगाबादेत देशातील ‘मंगलम वेडिंंग डेस्टिनेशन क्लब’ शुभांरभ

Published by :
Published on

आपल्या मुलामुलीच्या लग्नाच्या वेडिंग डेस्टीनेशनसाठी थायलंड, गोवा, केरळ, राजस्थानचा विचार करत असाल तर जरा थांबा. आता तुम्हाला पर्यटनाची राजधानी औरंगाबादेतच 'वेडिंग डेस्टीनेशन' उपलब्ध होणार आहे. सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये शाही लग्न सोहळा पार पाडण्यासाठी आता वाढत्या महागाईच्या काळात गादिया ग्रुपने एक मोठे पाऊल उचलले आहे.

मंगलम वेडिंंग डेस्टिनेशन क्लब अशा देशातल्या एका मोठ्या प्रकल्पाचा शुभांरभ आज गादिया ग्रुपच्या माध्यमातून करण्यात येत आहे. औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील पुरीमध्ये १६ एकर परिसरात हा शानदार प्रकल्प साकारला जातोय. २० ते २५ लाख खर्च अंदाजित असणाऱ्या या डेस्टिनेशन लग्नाच्या खर्चासाठी सहा लाखात गोल्ड मेंबरशिप आणि साडे चार लाखात सिल्व्हर मेंबरशीप अशा दोन मेंबरशीपचाही आजपासून शुभारंभ करण्यात येतोय. फॅमिली मेंबरशीप असणाऱ्या या योजनेचा तब्बल पंधरा वर्ष लाभ घेता येणार आहे. गादिया ग्रुपच्या या क्लबमुळे गुंतवणूकदार आणि पालकांसाठी एक सुवर्णसंधी निर्माण झाली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com